राजकारण हा भावभावनांचा खेळ
धर्म जात पंथ मुलं महिला निराधार शेतकरी अन्
नात्या गोत्यात माजवून ठेवलाय गोंधळ
आता फक्त तो आहे राजकीय पटलावरचा खेळ...
घर नगरसेवक आमदार खासदार पक्ष अन्
बिनकामी सरदार भितीने झाले खबरदार
कुणाचीही कामगिरी नाही दमदार
जनमताचा अनादर निष्ठा होतीये फक्त चेष्टा...
आजघडीला नुसती फोडाफोडी तोडातोडी
सत्ता नितीमत्ता अन् विरोधात जमली अनोखी जोडी
दररोज भरला भावभावना अन् आश्वासनांचा बाजार
जनता महागाई बेरोजगार आजाराने झाली बेजार..
अनाकलनीय शब्दांचा बेसुमार झाला खेळ
कसलाच नाही मेळ जनमताची झाली नुसती भेळ
खर्चाचा नाही ताळमेळ... तरीही सुरू आहे गद्दार अन्
पक्षांतराचा खेळ इकडे तिकडे उड्या मारण्याचा...
राजकारण हा खेळ धनवान अन् बलवानांचा
कार्यकर्ते झाले नुसतेच बेभान
सतरंजी उचलण्यात आहे खरा अभिमान
कशाचीच नाही जाण
खुळचट घेतायत खोटी आण
जराही ठेवला नाही जागृत स्वाभिमान....
संजय रोडे, प्रतिनिधी,
दिल्ली प्रेस, मुंबई